(राजापूर / तुषार पाचलकर)
महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा विस्तार वेगाने सुरू असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज एकवटत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पक्षाच्या शाखा स्थापन होत असून, त्याच पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची अधिकृत तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
जिल्हा उपाध्यक्ष श्री. रमेश पाजवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणून आयु. नरेश कांबळे, उपाध्यक्ष आयु. प्रदीप वळंजू व पांडुरंग माने, महासचिव आयु. विलास परुळेकर, सहसचिव आयु. दत्ताराम जाधव व सुभाष ताम्हणकर, खजिनदार मनिष कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
संघटक म्हणून सर्फराज दाऊद नाईक, मुनाफ सुलेमान नाईक, प्रकाश कलमस्टे, सुहास इस्कर, शांताराम गोलिपकर, प्रकाश आजिविलकर, अतुल कांबळे, किसन यशवंत जाधव, शामराव वळंजू, दशरथ भिवा जाधव व महेंद्र पवार यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनील केरू पवार, सुरेश शांताराम घरत, शरद सहदेव जाधव, विजयकुमार भाऊ जाधव, सिताराम जाधव, मनोहर विठोबा कलमस्टे व महेंद्र हरी परुळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लवकरच पक्षाची ध्येयधोरणे प्रत्येक गावात पोहोचवून एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्याक समाजापर्यंत संघटन वाढविण्याचा संकल्प असल्याचे तालुकाध्यक्ष नरेश कांबळे व महासचिव विलास परुळेकर यांनी यावेळी सांगितले.

