(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल दिवाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय नवोदय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या यशामुळे शाळेचे तसेच संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल झाले असून, यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या परीक्षेत कु. मनस्वी जीवन सुतार, कु. स्वरा कृष्णकांत सुतार, कु. पायल सतीश सुतार, कु. प्रियल अजित गोरुले तसेच कुमार निर्मित विकास सुतार आणि कु. गार्गी सुनील सुतार यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि पाचल येथील अपेक्षा कोचिंग क्लासेस तसेच पालक संघ यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे. सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

