(रत्नागिरी / वार्ताहर)
प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू अंतर्गत उपकेंद्र पुनस येथील ग्रामपंचायत कुर्णेच्या आवारात नव्याने उभारण्यात आलेल्या गप्पी मासे पैदास केंद्रात गप्पी मासे सोडण्याचा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मनाली माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबूचे आरोग्य निरीक्षक श्री. दिलीप विठ्ठल गुरव प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमास श्री. सुधीर एकनाथ लिंगायत (MPW), श्रीमती प्रिती कांबळे (ANM, पुनस), ग्रामपंचायत अधिकारी सौ. घोसाळे, श्री. सुहास माने (लिपिक) तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाअंतर्गत श्री. सुधीर लिंगायत यांनी ग्रामस्थांना वेळोवेळी कीटकजन्य आजारांविषयी मार्गदर्शन करत गप्पी माशांचे महत्त्व समजावून सांगितले असून या कामासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
यावेळी आरोग्य निरीक्षक श्री. दिलीप गुरव यांनी समाधान व्यक्त केले. तसेच लवकरच परिसरातील परराज्यांतून आलेल्या मजुरांचे रात्रीच्या वेळी हत्तीरोग सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

