( मुंबई )
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने गुंतवणुकीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राज्य सरकारने विविध देशी-विदेशी कंपन्यांसोबत तब्बल ₹14.5 लाख कोटींचे सामंजस्य करार (MoU) केले असून, यामधून सुमारे 15 लाख थेट रोजगार निर्माण होणार आहेत. विशेष म्हणजे या गुंतवणुकीतील मोठा हिस्सा कोकणासह रत्नागिरी, पालघर, गडचिरोली आणि अहिल्यानगर या भागांत येणार आहे.
हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद निर्मिती, आयटी-आयटीईएस, डेटा सेंटर्स, ईव्ही-ऑटोमोबाईल, जहाज बांधणी आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशासह कोकण व आदिवासी भागात औद्योगिक विकासाला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.
प्रमुख गुंतवणूक करार
महाराष्ट्र सरकार – येओमन मरीन सर्व्हिसेस प्रा. लि.
-
क्षेत्र: जहाज बांधणी
-
गुंतवणूक: ₹1,050 कोटी
-
रोजगार: 1,575
-
ठिकाण: रत्नागिरी (कोकण)
महाराष्ट्र सरकार – काल्सबर्ग
-
क्षेत्र: अन्न प्रक्रिया व कृषी
-
गुंतवणूक: ₹500 कोटी
-
रोजगार: 750
महाराष्ट्र सरकार – योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि.
-
क्षेत्र: नवीकरणीय ऊर्जा
-
गुंतवणूक: ₹4,000 कोटी
-
रोजगार: 6,000
-
ठिकाण: पालघर / एमएमआर
महाराष्ट्र सरकार – बीएफएन फॉर्जिंग्स
-
क्षेत्र: पोलाद
-
गुंतवणूक: ₹565 कोटी
-
रोजगार: 847
-
ठिकाण: पालघर / एमएमआर
एमएमआरडीए अंतर्गत मोठे करार
एमएमआरडीए – सुमिटोमो रियल्टी
-
गुंतवणूक: सुमारे 8 अब्ज डॉलर्स
-
रोजगार: 80,000
एमएमआरडीए – के. रहेजा कॉर्प
-
गुंतवणूक: सुमारे 10 अब्ज डॉलर्स
-
रोजगार: 1 लाख
एमएमआरडीए – अल्टा कॅपिटल / पंचशील
-
गुंतवणूक: सुमारे 25 अब्ज डॉलर्स
-
रोजगार: 2.5 लाख
एमएमआरडीए – एसबीजी समूह
-
क्षेत्र: लॉजिस्टिक्स
-
गुंतवणूक: सुमारे 20 अब्ज डॉलर्स
-
रोजगार: 4.5 लाख
एमएमआरडीए – आयआयएसएम ग्लोबल
-
गुंतवणूक: सुमारे 8 अब्ज डॉलर्स
-
रोजगार: 80,000
याशिवाय,
-
जायका धोरण व रणनीती भागीदार
-
सेम्बकॉर्प डेव्हलपमेंट (सिंगापूर) एकीकृत औद्योगिक पार्कसाठी नॉलेज पार्टनर
-
टेक्निकल युनिव्हर्सिटी, म्युनिक (जर्मनी) शाश्वत नागरी वाहतूक प्रणालीसाठी भागीदार
राज्यातील इतर महत्त्वाचे करार
महाराष्ट्र सरकार – सुरजागड इस्पात
-
क्षेत्र: पोलाद
-
गुंतवणूक: ₹20,000 कोटी
-
रोजगार: 8,000
-
ठिकाण: गडचिरोली
महाराष्ट्र सरकार – लोढा डेव्हलपर्स
-
क्षेत्र: आयटी, डेटा सेंटर्स
-
गुंतवणूक: ₹1 लाख कोटी
-
रोजगार: 1.5 लाख
या करारांमुळे महाराष्ट्र देशातील सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य म्हणून पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले असून, फडणवीस सरकारच्या औद्योगिक धोरणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दखल मिळत असल्याचे चित्र आहे.

