(रत्नागिरी)
संगमेश्वर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतून तीन महिला नापत्ता झाल्या आहेत. या महिलांबाबत कोणाला माहिती मिळाल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सुनंदा सखाराम भालेकर, वय- 65 वर्षे, रा. चाफवली, उगवतीवाडी, ता. संगमेश्वर या दि. 16 ऑक्टोबर 2019 रोजी 9 वा. च्या सुमारास चाफवली येथून नापत्ता झालेल्या आहेत. त्यांची उंची 5 फूट वर्ण निमगोरा, केस पांढरे बॉब कट केलेला, नेसणीस सावारी साडीचे दोन तुकडे ब्लावुज, मोजके बोलणे, 28 वर्षा पासून मनोरुग्ण आहे.
स्वाती चंद्रकांत लोहार, वय- 40 वर्षे, रा. तुळसणी, राउळवाडी, ता. संगमेश्वर या दि.20 नोव्हेंबर 2025 रोजी 12.30 ते 13.30 वाजताच्या दरम्यान तुळसणी, राउळवाडी, ता. संगमेश्वर येथून नापत्ता झाल्या आहेत. त्यांची उंची 5 फूट 2 इंच, शिक्षण- 10 वी पास, धर्म- हिंदु सुतार, अंगात- टॉप व जिन्स आहे, अंगाने सडपातळ, रंग- गोरा, केस- काळे व लांब, चेहरा- गोल, नाक- सरळ, गळ्यात- सोनेरी धातुची चैन, कानात- नकली टॉप, उजवे हाताचे अंगठ्याचे वरील बाजूस गोंदलेले, तिचे जवळ रेडमी 9 ए कंपनीचा मोबाईल त्यामध्ये जिओ सिम नं. 9226638601 आहे.
श्रीमती विजया हरिश्चंद्र लिंगायत, वय- 75 वर्षे, रा. मौजे साखरपा गुरववाडी, ता. संगमेश्वर, हे दि.3 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9 वा. चे सुमारास साखरपा, ता. संगमेश्वर येथून नापत्ता झालेले आहेत. त्यांचा चेहरा उभट, केस- पांढरे, नाक-सरळ, रंग-सावळा, उंची 5 फूट 2 इंच, बांधा- सडपातळ, नेसणीस- सहावारी साडी आबोली कलरची, कानात- नकली कुडी, गळ्यात काळा दोरा, पायात- साधे चप्पल, शिक्षण झालेले नाही, तिचे अंगावर सोन्याचे दागिने अगर पैसे नाहीत.

