(लांजा)
रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत लांजा तालुकास्तरीय शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा देवधे मनचेचा विद्यार्थी सोहम रवींद्र खेगडे याने उल्लेखनीय कामगिरी केली. 100 मीटर धावणे स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावला, तर मोठ्या गटातील लांब उडी स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला.
सोहमने सलग तीन वर्षे जिल्हा स्पर्धेत लांजा तालुक्याचे प्रतिनिधित्व केले असून, या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे देवधे परिसरात त्याचे कौतुक होत आहे. याशिवाय त्याची कबड्डी व खोखो संघातही निवड झाली असून, लांजा तालुका संघातून तो जिल्हा स्पर्धेत आपले कौशल्य सादर करणार आहे.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक संतोष जाधव, नंदकुमार पाटोळे सर, नानासाहेब गोरड सर आणि सायली तिखे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय खेगडे यांनी सोहमचे अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

