( राजापूर / तुषार पाचलकर )
दर्पण वृत्तपत्र आणि हिंदी मराठी पत्रकार संघटना (आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त ) यांच्या वतीने दर्पण पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार दै. रत्नागिरी टाइम्स मुक्त प्रतिनिधी शरद मोरे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त 6 जानेवारी रोजी बुलाढाना येथे करण्यात येणार आहे.
मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत दर्पण वृत्तपत्र आणि हिंदी मराठी पत्रकार संघटना आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त (आयएसओ 9001-2015) यांच्या वतीने दर वर्षी विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दर्पण राज्यस्तरीय पुरस्कार तर पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराना दर्पण पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
दै. रत्नागिरी टाइम्स मध्ये मुक्त प्रतिनिधी म्हणून काम करणारे शरद मोरे यांनी गेल्या 33 वर्षात विविध दैनिकात वार्ताहर, प्रतिनिधी, उपसंपादक, संपादकीय प्रमुख म्हणून काम केले आहे. तर लांजा राजापूर वृत्त, कोकण सहकार साप्ताहिक समूह संपादक आहेत. तसेच ग्रामआधार स्वयंसेवी संस्था संचालित जीवनज्योती मतिमंद मुलांची शाळा गुहागर जिल्हा रत्नागिरीचे अध्यक्ष आहेत. पत्रकार शरद मोरे यांनी दर्पण पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

