(देवरुख / सुरेश सप्रे)
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व शिवसेनेचे युवानेते रोहन बने यांच्या वाढदिवसानिमित्त बॅडमिंटन असोसिएशन ऑफ संगमेश्वर तालुका, देवरुख यांच्या वतीने तालुकास्तरीय दुहेरी बॅडमिंटन लीग स्पर्धा २०२५चे आयोजन करण्यात आले आहे.
देवरुख येथील सौ. सुलभाताई आपटे क्रीडा संकुल येथे सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन रोहन बने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ संगमेश्वर तालुका अध्यक्ष मंगेश प्रभुदेसाई, मोहन हजारे, निलेश चव्हाण, दिलीप विंचू आदी मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने यांनी तरुणांमध्ये खेळाची आवड, शिस्त आणि संघभावना वाढवी या भावनेने पुरस्कृत केली आहे. क्रीडा व सामाजिक उपक्रमातून आपला वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली आहे .
१९ वर्षांखालील मुले, एकेरी तसेच महिला दुहेरी बॅडमिंटन प्रकारांमध्ये चुरशीच्या लढती रंगत असून संपूर्ण क्रीडा संकुल खेळाडूंच्या उत्साहाने भारावून गेले. या स्पर्धेला तालुक्यातील खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

