(रत्नागिरी)
तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अंतर्गत होणारी सब ज्युनिअर राज्यस्तरीय तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धा २६ ते २८ डिसेंबर दरम्यान वासुदेव हॉल, उद्यमनगर, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेसाठी गणराज क्लबची क्योरोगी प्रकारातील खेळाडू कु. बरखा सर्फराज संदे हिची निवड झाली असून ती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
बरखाला आंतरराष्ट्रीय खेळाडू, एशियन युनियन कोच, राष्ट्रीय पंच आणि महाराष्ट्र राज्य स्वयंमसिद्धा प्रशिक्षक श्री. प्रशांत मनोज मकवाना तसेच महिला प्रमुख प्रशिक्षक सौ. आराध्या प्रशांत मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गणराज क्लबने यापूर्वीही राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बरखाच्या या यशामागे तिच्या पालकांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगण्यात येत आहे.
निवडीबद्दल रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्री. अभय तेली, सामाजिक कार्यकर्ते श्री. मुन्ना देसाई यांनी बरखाला शुभेच्छा दिल्या. याशिवाय नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुरवे, नगरसेविका सौ. पूजा पवार, श्री. सौरभ मलुष्टे, तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारिणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर, जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण के, खजिनदार शंशाक घडशी तसेच गणराज क्लबचे अध्यक्ष सौ. पूजा शेट्ये, उपाध्यक्ष साक्षी मयेकर, सचिव रंजना मोडूंळा, सौ. स्नेहा मोरे, श्री. परेश मोंडूला, शलाका जावकर, प्रशिक्षक शाहरुख शेख, मिलिंद भागवत आणि पालकवर्गाने तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

