( संगमेश्वर / प्रतिनिधी )
बुरंबी संगमेश्वर येथील दादासाहेब सरफरे विद्यालय व बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय विद्या संकुल क्रीडांगणात बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित दादासाहेब सरफरे कला क्रीडा महोत्सव २०२५ चे उद्घाटन माजी राज्यमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्र माने, अतिरिक्त जिल्हाधिकारी सौ असावरी संसारे, गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांच्या उपस्थितीत माजी जि.प. माजी अध्यक्ष रोहन बने यांच्या शुभहस्ते अगदी जल्लोषमय वातावरणात पार पडले.
यावेळी झांज पथकांसह मान्यवर व सहभागी खेळाडूंच्या उपस्थितीत तेर्ये गाव येथील देवी वाघजाई मंदीरापासून बुरंबी हायस्कुल जूनी इमारत ते दादासाहेब सरफरे क्रिडा नगरी असे क्रीडा ज्योतीचे आगमन होवून या क्रीडा महोत्सवास हजर असलेले सर्व मान्यवरांचे बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था व्यासपीठावर आगमन झाले. सोहळा अध्यक्ष मा. श्री प्रताप देसाई यांचे उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व देवी सरस्वतीस पुषपहार घालून पूजन केले व दीप प्रज्वलन केले गेले, यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचे संस्थेच्या वतीने शाळ श्रीफळ व बुके देउन यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्था उपाध्यक्ष मा. श्री विक्रांत जाधव यांनी आपल्या प्रात्साविकात संस्थेचा क्रीडा महोत्सवाबाबतचा उद्देश, आणि शाळेच्या शालेय व सहशालेय उपक्रमाबाबत माहिती दिली,
तर जि.प. माजी अध्यक्ष रोहन बने यांनी उपस्थित क्रिडा प्रेमी, परीसरातील सहभागी शाळांमधील स्पर्धक, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी यांना संबोधताना, “सृजनशिलता आणि विवेकशीलता हे दोन पैलु विद्यार्थ्यांकडे असतील तर ते सहज यशाची शिखरे प्रादाकांत करु शकतात. यासाठी विद्यार्थ्यानी समाज जाणिवेतून संस्कार म्हणुन जे जे चांगले ते स्विकारुन जिज्ञासा वृत्ती अंगी जोपासणे आवश्यक आहे” असे सांगित्ले. तर अतिरिक्त जिल्हाधिकारी सौ असावरी संसारे मॅडम यांनी संबोधताना.’ बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेने या क्रीडामहोत्सवासारखे व्यासपीठ देऊन शालेय किशोरवयीन विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालयीतील युवक युवतीना त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन व प्रेरणा दिली आहे. त्यामुळे संस्थेचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे” असे सांगितले .
क्रीडा महोत्सवाचे मुख्य उद्घाटक माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांनी बोलताना ” बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना क्रीडा महोत्सवासारखे व्यासपीठ देऊन विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चालना व प्रेरीत करण्यांचे काम केले आहे. असे ग्रामीण भागात राज्यस्तर उपक्रम राबविले जाणे गरजेचे असून सर्वानीच यासाठी पुढाकार घेतला पाहीजे. शालेय दशेत जमीनीवर विद्यार्थ्यांनी मांडी घालून बसलेले असतना आपले लक्ष मात्र आकाशाकडे झेप घेणारे असाबे. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही क्षेत्र अवघड नाही. त्यासाठी सतत ध्यास, आई वडीलांची स्वप्ने पुर्ण करण्याचे ध्येय, आणि आपल्या शाळेप्रती गावाप्रती असलेले प्रेम, एक उत्तम आदर्श विद्यार्थी घडण्यास सहज प्रवृत्ती निर्माण करते. यासाठी दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या या उपक्रमास मी शुभेच्छा देत आहे” असे सांगितले.
यावेळी संस्था उपाध्यक्ष प्रताप नारायण देसाई यांनी बोलताना “संस्थेच्या २००६ पासून जल्लोषमय वातावरणात संपन्न होणा-या या कला क्रीडा महोत्सवाचे हे १६ वे वर्ष आहे. दादासाहेब सरफरे क्रीडा नगरीत संपन्न होणा-या या जल्लोषमय महोत्सवामध्ये संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झालेले असून खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल व रस्सीखेच सारख्या मैदानी स्पर्धा व उंच उडी, थाली फेक, भाला फेक अशा वैयक्तिक स्पर्धा सुरु होणार आहेत. शाळेची तालुकास्तर प्रगती तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची कला व क्रीडा क्षेत्रात विभागस्तर व राज्यस्तर होत असलेली प्रगती ही पंचक्रोशीसह आम्हा सर्वानाच अभिमानास्पद असून शालेय संस्था संस्थापक म्हणून संस्था व शाळेसाठी सुभाषभाई सरफरे, बाबा गर्दे यांचे योगदानावद्दल विस्तारपुर्वक माहिती दिली व या क्रीडामहोत्सवास उपस्थित मान्यवारांचे आभार मानले.
या नंतर रोहन बने (माजो जि.प. अध्यक्ष), संस्था उपाध्यक्ष विक्रांत जाधव, संस्था खजिनदार महेश जाधव यांच्या हस्ते नाणे फेक होऊन कबड्डी, खो-खो, व मैदानी स्पर्धा सुरु झाल्या.प्रथम दिवशी संपन्न झालेल्या या क्रीडा स्पर्धामध्ये १७ वर्षे मुली कबड्डी क्रीडा प्रकारात वैदही कान्हेरे सर्वोत्कृष्ठ खेळाडू तर शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब या प्रशालेने प्रथम, कुरधुंडा विद्यालय शाळेने द्वितीय व माध्यमिक विद्यालय सोनवडे प्रशालेने तृतीय क्रमांक पटकाविला
१९ वर्षे मुलगे कबड्दी क्रीडा प्रकारात सर्वोत्कृष्ठ खेळाडू अमोल मंगेश जाधव (दादासाहेब सरफरे विद्यालय) तर बुरंबी शिक्षण संस्था कनिष्ठ कला वाणिज्य महाविद्यालय या प्रशालेने प्रथम, पैसा फंड हायस्कुल शाळा तृतीय व भाईशा घोसाळकर हायस्कुल कडवई प्रशालेने द्वितीय क्रमांक पटकाविला.
१७ वर्षे खो – खो मुलगे क्रीडा स्पर्धेत हर्षद पर्शुराम सर्वोत्कृष्ठ खेळाडू तर माध्यमिक विद्यालय सोनवडे या प्रशालेने प्रथम, कसबा हायस्कुल शाळेने द्वितीय व दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी- शिवने प्रशालेने तृतीय क्रमांक पटकाविला, १७ वर्षे वयोगट मुलगे थाळी फेक वैयक्तिक स्पर्धेत अलोक प्रविण कुरतडकर (पा.गो.म.मा.विद्यालय धामापूर) प्रथम क्रमांक राहुल धाकू झोरे (डॉ. र. डी. गार्डी विद्यालय कळंबस्ते) द्वीतीय क्रमांक तर तृतीय क्रमांक चिराग तानाजी विचारे (कळंबस्ते हायस्कूल) यांनी पटकाविला.
१७ वर्षे मुली गोळा फेक वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी दानिया वशिमराजा जुवळे (कडवई हायस्कुल), श्रावणी महेश कदम (न्यू इंग्लिश स्कूल देवरुख) द्वीतीय क्रमांक तर तृतीय क्रमांक वैदही दीपक कान्हेरे (शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब) यांनी पटकाविला.१७ वर्षे गोळा फेक मुलगे वैयक्तिक क्रीडेमध्ये राहुल धाकु झोरे (गार्डी हायस्कुल, कळंबस्ते प्रथम क्रमांक, यश संतोष गोसावी (दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी द्वीतीय क्रमांक तर तृतीय क्रमांक गंधर्व धनंजय लवंदे (न्यु इंग्लिश स्कुल कसबा) यांनी पटकाविला.
१७ वर्षे मुली थाळी फेक वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत उर्वी विद्याधर चव्हाण (शिवाजी विद्यालय कोसुंब) प्रथम क्रमांक, कुमारी वैष्णवी गुरव (माध्यमिक विद्यालय सोनवडे) द्वीतीय क्रमांक तर तृतीय क्रमांक कुमारी अनुष्का मंगेश साठले (कळंबस्ते हायस्कूल) यांनी पटकाविला. रसीखेच मुली स्पर्धेत भाईशा घोसाळकर कडवई या प्रशालेने प्रथम, शिवाजी माध्य. विद्यालय कोसुंब शाळेने द्वितीय तर दादासाहेब सरफरे विद्यालय प्रशालेने तृतीय क्रमांक पटकाविला
क्रिडा महोत्सवाच्या प्रथम दिनी संस्था उपाध्यक्ष विक्रांत यशवंत जाधव , उपाध्यक्ष प्रताप नारायण देसाई,, सरचिटणीस शरद बाईत, खजिनदार महेश जाधव, सचिव ललितकुमार लोटणकर, शाळा समिती अध्यक्ष दिनेश शामराव जाधव, संचालक शांताराम काशिराम जाधव, संचालक सचिन सित्ताराम मोहीते यांच्या हस्ते विजयी संघास व विजयी वैयक्तिक क्रीडा स्पर्धकांना भव्य चषक, रोख बक्षिस व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेच्या संचालक व संस्थेचे माजी अध्यक्ष राजाराम गर्दे, प्राचार्य प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे उपस्थित होते तर सुत्रसंचलन व निवेदन सहाय्यक शिक्षक सुहास गेल्ये, अमित भुवड व सुरेंद्र कुळ्ये, सौ. स्वरुपा भोसले यांनी केले.

