(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील उपळे पवारवाडी (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील ५५ वर्षीय महिलेचा रहस्यमय बेपत्ता झाली असून, याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात नापत्ता नोंद करण्यात आली आहे. सौ. सरिता सागर सुर्वे (वय ५५) या दि. १२ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेल्यापासून त्यांचा पत्ता लागलेला नाही.
प्राप्त माहितीनुसार, घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांकडे तसेच परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, कोणताही ठोस तपास लागला नाही. अखेर दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी १.४६ वाजता त्यांचे पती सागर घोडू सुर्वे (वय ५६) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार नापत्ता रजिस्टर क्रमांक १८/२०२५ नुसार नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे अंमलदार व्ही. एस. तावंडे यांनी नोंद घेतली असून, पुढील तपास पोहेकॉ/४६५ वाय. एम. सासवे करत आहेत. नापत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना बिनतारी संदेशाद्वारे सतर्क करण्यात आले आहे. दरम्यान, सौ. सरिता सुर्वे यांच्याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नापत्ता महिलेचे वर्णन
सौ. सरिता सागर सुर्वे, शिक्षण – ७ वी, उंची – ५ फूट १ इंच, रंग – सावळा, बांधा – सडपातळ, काळे लांब केस, काळे डोळे, उभट चेहरा. हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात छोट्या काळ्या मण्यांचे मंगळसूत्र. अंगावर लाल व काळ्या रंगाची सहवारी साडी व लाल ब्लाऊज, पायात पिवळ्या रंगाची चप्पल. भाषा – मराठी.

