(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा व तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती खेडशी नाका येथे उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आदरणीय भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. पंचांग प्रणाम, त्रिशरण, पंचशील व सूत्रपठणाने वातावरण बुद्धमय झाले. यावेळी जिल्हा संघटक आयु. तानाजी कांबळे यांचा त्यांच्या विद्युत मंडळातील सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष आयु. अनंत सावंत यांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.
भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर, जीवनदृष्टीवर आणि त्यांच्या योगदानाच्या विविध पैलूंवर आयु. डॉ. जनार्दन मोहिते यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. तसेच आयु. विजय मोहिते व राजेंद्र कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात अनंत सावंत यांनी भैय्यासाहेबांना सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आलेल्या अडचणींचा उल्लेख करत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अधुरे स्वप्न जोमाने कसे पुढे नेले, यावर प्रकाश टाकला. आंबेडकर परिवारावर झालेला अन्याय व त्याला दिलेले साहसपूर्ण उत्तर याविषयीही त्यांनी उपस्थितांना चिंतनशील विचार दिले.
या कार्यक्रमाला प्रदिप जाधव, विजय कांबळे, तानाजी कांबळे, सुनिल पवार, विजय जाधव, सुरेश जाधव, आदेश कांबळे, प्रविण पवार, अनंत जाधव, राजेंद्र कांबळे तसेच उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय वाय. जाधव यांनी पार पाडले. शरणत्तय घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

