(रायगड)
पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने ५ लाख १४ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. फिर्यादी संतोष अस्वले यांनी टाटा स्टीलची खरेदी करण्यासाठी गुगलवर आरोपीचा नंबर शोधून ऑर्डर दिली होती. आरोपी सूर्यांश सहज सिंह (वय २२, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) यांनी खोटे इनव्हॉईस पाठवून ही फसवणूक केली.
तांत्रिक तपासानंतर आरोपीचा लोकेशन सुलतानपूर, उत्तर प्रदेश असताना, सायबर पथकाने रात्री प्रवास करून आरोपीला भीमताल पोलीस ठाण्यात (नैनिताल, उत्तराखंड) ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यात असलेले मोबाईल डिव्हाइस आणि लॅपटॉप मिळाले, ज्यामध्ये गुगल ऍड्सद्वारे आपली जाहिरात आणि वेबसाईट तयार करण्याचे पुरावे तसेच मुख्य आरोपीसह चॅट्स आढळले आहेत.
पनवेल पोलीस सायबर पथकाचे पो उप निरीक्षक अभय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा थवई, पो.शि. गायकवाड, पो.शि. मेरया, पो.शि. पालवे, पो.ना. प्रवीण पाटील यांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला नैनिताल न्यायालयासमोर हजर करून ट्रान्झिट रिमांड मिळवण्यात आले. पुढील तपास पो उप निरीक्षक अभय कदम करत आहेत.

