(रत्नागिरी)
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रातील प्राथमिक फेरीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. समर्थ रंगभूमी, रत्नागिरी संस्थेच्या ‘अग्निपंख’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावत एकूण सात पारितोषिकांवर आपले नाव कोरले आहे, तर वीरशैव समाज, लांजा संस्थेच्या ‘ईठ्ठला’ या नाटकाने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी निकालांची अधिकृत घोषणा केली. या दोन्ही नाटकांची राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी केंद्रावर सादर झालेल्या १८ नाट्यप्रयोगांपैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नाटकांमध्ये खरडेवाडी क्रीडा मंडळ, मेर्वी यांचे ‘इम्युनिटी (द व्हॉइस ऑफ टॉलरन्स)’ या नाटकाला तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
वैयक्तिक पारितोषिके – उत्कृष्ट कामगिरीची दखल
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: ओंकार पाटील (अग्निपंख), अमोल रेडीज (ईठ्ठला), संदेश तोडणकर (इम्युनिटी)
उत्कृष्ट प्रकाश योजना: साई शिर्सेकर (अग्निपंख), दयानंद चव्हाण (ईठ्ठला), अभिजीत डोंगरे (इम्युनिटी)
उत्कृष्ट नेपथ्य: प्रविण धुमक (अग्निपंख), संदिप सावंत (ईठ्ठला), सत्याजीत गुरव (येऊन येऊन येणार कोण?)
उत्कृष्ट रंगभूषा: उदयराज तांगडी (अग्निपंख), गजानन पांचाळ (ईठ्ठला), नरेश पांचाळ (इम्युनिटी)
उत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: ओंकार बंडबे (अग्निपंख), प्रदीप कांबळे (ईठ्ठला), योगेश मांडवकर (इम्युनिटी)
उत्कृष्ट वेशभूषा: चैताली पाटील (अग्निपंख), संतोष डोर्लेकर (ईठ्ठला)
अभिनय पुरस्कार
उत्कृष्ट अभिनय (रौप्यपदक): मिनार पाटील (अग्निपंख), ऋचा भुते (अग्निपंख)
अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे: अमोल रेडीज (ईठ्ठला), जयू पाखरे (ऑक्सिजन), संदेश तोडणकर (इम्युनिटी), गोपाळकृष्ण जोशी (येऊन येऊन येणार कोण?), अर्चना पेणकर-पांचाळ (ईठ्ठला), तन्वी शिंदे (इम्युनिटी), डॉ. नेहा उकिडवे (मंगलाक्षता), निवेदिता मणचेकर (ऑक्सिजन)

