( रत्नागिरी )
येथील क्षत्रिय मराठा मंडळ आयोजित वधू वर परिचय मेळाव्याला चांगला प्रसिसाद मिळाला. टीआरपी येथील अंबर हॉल येथे मेळाव्यात २५० वधू- वर व त्यांचे पालक उपस्थित होते. या वेळी मंडळाच्या मराठा सप्तपदी या वेबसाईटचे अनावरण वधुवर समिती प्रमुख संध्या मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मंडळाच्या www.marathasaptapadi.com या वेबसाईटवर नवीन नोंदणी करू शकणार आहोत. सदर वेबसाईट वरती मंडळाकडे चालू वर्षी नोंदणी केलेले जवळपास १२५ वधू- वर यांचे प्रोफाइल्स अपलोड करण्यात आले आहेत. नोंदणीकृत प्रोफाइल्सचे यूजर आयडी व पासवर्ड संबंधित उपवर वधू वर यांना देण्यात आले आहेत. मेळाव्याच्या प्रसंगी नव्याने नोंदणी झालेल्या सर्व वधूवर यांचे प्रोफाइल मंडळाकडून 17 डिसेंबरपर्यंत अपलोड केले जाणार आहेत. यापूर्वी नोंदणी केलेल्या वधू वर यांचे प्रोफाइल 27 डिसेंबरपर्यंत मंडळाकडून अपलोड केले जाणार आहेत. अपलोड केलेल्या वधु वर यांच्या प्रोफाईल चे यूजर आयडी व पासवर्ड संबंधित वधूवरांना व्हाट्सअप द्वारे पोहोच केले जाणार आहेत. वेबसाईट नवीन नोंदणीसाठी खुली करण्यात आली आहे. 7 जानेवारीपर्यंत जे वधू- वर या वेबसाईटवर आपले प्रोफाइल अपलोड करतील त्यांच्यासाठी फक्त 499 एवढे माफक शुल्क आकारण्यात येणार आहे.
मेळाव्यामध्ये मंडळाच्या उपाध्यक्ष प्राची शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संतोष तावडे यांनी वेबसाईट व मराठा बिझनेसमन फोरमची माहिती सांगितली. अमित कदम यांनी सूत्रसंचलन केले. सचिव योगेश साळवी यांनी मेळाव्याला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानले.

