( रत्नागिरी )
नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशनच्या संयोजनात आयोजित ५९ वी महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा नवी मुंबईतील एमजीएम हॉस्पिटलजवळील सेक्टर १ ए, वाशी येथे उत्साहात पार पडली.
या स्पर्धेतील महिला एकेरी गटाच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा उदय कदम हिने मुंबईच्या मिताली पाठक हिचा १७-१४, २५-०२, २५-०१ अशा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत प्रभावी विजय मिळवून महिला गटाचे अजिंक्यपद पटकावले.
आकांक्षा कदम हिने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल राज्याचे उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत तसेच रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सल्लागार सुचय अण्णा रेडीज, अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सचिव मिलिंद साप्ते आणि खजिनदार नितीन लिमये यांनी तिचे मन:पूर्वक अभिनंदन केले.