(रत्नागिरी)
कोकण मराठी साहित्य परिषद् शाखा रत्नागिरीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 या महापरिनिर्वक दिनाच्या निमिताने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाचे अभिवाचन करण्यात आहे.
कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन उर्फ आबा पाटील, प्रा. चंद्रमोहन देसाई, विनायक हातखंबकर, डॉ. आनंद आंबेकर, अंजली पिलणकर . आबा पाटील, हुसेन पठाण, विद्याधर कांबळे, यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
अ.के. देसाई हायस्कूल येथील विद्यार्थीनी तन्वी तुपारे, पायल वाघमारे, उमेरा बागवान, अवणी कांबळे, मुस्कान मुल्ला, पूर्वा कांबळे, महेक मुल्ला, सिध्दी कांबळे यांनी बाबासाहेबांचे चरित्र वाचन केले.
बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ या प्रसिद्ध पुस्तकाचे विनायक हातयंबकर, प्रा.चंद्रमोहन देसाई, अंजली पिलणकर, डॉ. आनंद आंबेकर, अशोक भाटकर, बाळकृष्ण झोरे, माधुरी दारोकर, वैजयंती पाटील, कृष्णा पाटील, हुसेन पठाण, अनंत सावंत आणि विद्याधर सुनिल कांबळे, राजेंद्र कांबळे, प्रा.सुदीप पवार ,श्री. कांबळे यांनी क्रमशः अभिवाचन केले.
सदर कार्यक्रम करणासाठी प्रा.चंद्रमोहन देसाई, विनायक हातखंबकर, डॉ. आनंद आंबेकर, अंजली पिलणकर, विद्याधर कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले.

