(रत्नागिरी)
एसएमसी ग्लोबल सेक्युरिटीज लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर ५० लाख ४२ हजार ७३८ रुपयांचे प्रॉफिट झाल्याचे भासवून त्यातील १० टक्के कमिशन आगाऊ मागून ८ लाख ३ हजार ९६९ रुपयांची फसवणूक इन्व्हेस्टर महिलेने केली. या प्रकरणी इन्वेस्टर महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत फिर्यादी यांच्या राहत्या घरी गांधी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे श्रीनगर खेडशी, रत्नागिरी येथे घडली. याप्रकरणी सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
फिर्यादी सुधीर भाऊ सकपाळ यांनी ४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत संशयित महिला हिने तिच्या व्हॉटसॲपनंबर वरुन फिर्यादी सुधीर सकपाळ यांना कंपन्यांचे अप्पर सर्कीट, ब्लॉक ट्रेड, एआय ट्रेडिंग, आयपीओ यांची माहिती देऊन कंपन्यांचे शेअर ट्रेडिंगबाबत सकपाळ यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. एसएमसी ग्लोबल सेक्युरिज लिमिटेड या कंपनीचा लोगो असलेल्या ॲप्लिकेशनमध्ये सकपाळ यांनी केलेल्या रक्कमेवर त्यांना ५० लाख ४२ हजार ७३८ रुपयांचे प्रॉफिट झाल्याचे भासवून ते प्रॉफिट फिर्यादी सकपाळ यांना परत देण्याकरिता संशयित महिलेने सकपाळ यांनी १० टक्के कमिशन आगाऊ मागवून सुधीर सकपाळ यांनी गुंतवणूक केलेली एकूण रक्कम ८ लाख ३ हजार ९६९ रुपये तसेच त्यावर फिर्यादी यांना झालेले प्रॉफिट फिर्यादी यांना न देता सुधीर सकपाळ यांची आर्थिक फसवणूक केली.