(खेड)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य महासचिव राजन कोरगावकर यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती खेड शाखेला सदिच्छा भेट देऊन सभासदांच्या विविध प्रश्नाविषयी चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शिक्षक समिती शाखा खेड राबवत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल खेड शाखेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले व शिक्षक समिती खेड शाखेचा आदर्श जिल्ह्यातील सर्व शाखांनी घ्यावा असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण तालुका नेते शरद भोसले, जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष अनिल यादव उपाध्यक्ष नरेश ठोंबरे, सल्लागार परशुराम पेवेकर, संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर, दिलीप यादव, ऑडिटर बबन मोरे, प्रसिद्धीप्रमुख नारायण शिरकर, विभाग अध्यक्ष सतीश गजमल, सुनील वाघमारे गजानन पालांडे, अनिल आंजर्लेकर, संतोष तांबट, भरत बोडके आदी शिक्षक समिती पदाधिकारी उपस्थित होते

