(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील बावीस खेडी बौद्धजन संघ यांचेवतीने दीक्षाभूमी बुद्धविहारात विद्याभूषण, महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा यांचा 134 वा जयंती महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये १४ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता ध्वजारोहण व बुद्धपूजापाठ , अल्पोहार त्यानंतर सायंकाळी चार ते आठ या वेळेत खंडाळा परिसरातून भव्य धम्म रॅली त्यानंतर रात्री आठ ते दहा या वेळेत बावीस खेडी बौद्धजन संघाचे अध्यक्ष सुनील उर्फ भाई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा होणार आहे.
यावेळी या जाहीर सभेमध्ये प्रमुख वक्ते बौद्धाचार्य वैभव पवार, मालगुंड आणि प्राध्यापिका रसिका सावंत गडनरळ यांचे विशेष प्रबोधनपर मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर जाहीर सभेचे अध्यक्ष सुनील विठ्ठल जाधव यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. तसेच याच कार्यक्रमात करमणुकीचा कार्यक्रम म्हणून रात्री साडेदहा वाजता दीक्षाभूमी कलामंच वाटद खंडाळा निर्मित एक भावनाप्रधान संगीत सामाजिक तीन अंकी नाटक लेखक शारदाकुमार शिर्सेकर आणि दिग्दर्शक कुलदीप जाधव दिग्दर्शित “दीप तुझ्या वंशाचा” हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.याच जयंती महोत्सवाचे औचित्य साधून बावीस खेडी संघाच्या कार्यक्षेत्रातील तरुणांनी एकत्रित येऊन दिनांक 11 ते 13 एप्रिल या कालावधीत जय भीम प्रीमियर लीग तालुकास्तरीय बौद्ध समाज मर्यादित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
भविष्यामध्ये बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळाच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेऊन समाजाची प्रगती कशी साधता येईल, याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाईल, असे प्रतिपादन बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळाचे अध्यक्ष सुनील उर्फ भाई जाधव आणि चिटणीस कुलदीप जाधव यांनी केले आहे .दरम्यान १४ एप्रिल रोजी होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमांसाठी बावीस खेडी बौद्धजन संघाच्या गाव शाखांमधील धम्म बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित करावे असे आवाहन बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळाचे अध्यक्ष सुनील उर्फ भाई जाधव, सभापती रजत पवार, सरचिटणीस कुलदीप जाधव आदींसह अन्य सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्य तसेच बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळा मुंबई संघटना, महिला मंडळ दीक्षाभूमी वाटद खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.