(चिपळूण)
संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण आयोजित ‘चिपळूण हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाच्या अनेक स्पर्धक विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. त्यामध्ये खुला गटातून (पुरुष) ५ की.मी. मध्ये कु. स्वराज संदिप जोशी (प्रथम क्रमांक), कु. यश मंगेश शिर्के (तृतीय क्रमांक), कु. ओंकार अनंत चांदिवडे (चतुर्थ क्रमांक), कु. राज राजेश तांबे (पाचवा क्रमांक) प्राप्त केला असून १७ वर्षे शालेय गटातून ५ की.मी. (मुलगे) कु. रुषप रविंद्र चव्हाण (पाचवा क्रमांक) आणि (मुली) कु. वेदिका विष्णू हरवडे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या स्पर्धक विद्यार्थ्याना प्रा. सुधीर हुमने, प्रा. रुपेश भालेकर आणि प्रा. विक्रांत निवाते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेमधील प्रथम तीन यशस्वी विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. उदयशेठ गांधी, कार्याध्यक्षा सई वरवाटकर, कार्यवाह प्रशांत देवळेकर, कोषाध्यक्ष सिद्धेश लाड, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाचे चेअरमन मल्लेश लकेश्री, पी.आर.ओ. योगेश चोगले, रजिस्ट्रार अजित खेडेकर, प्राचार्या अरुणा सोमण, प्राचार्य भाऊ कांबळे, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

