हिवाळ्यात अनेक जणांना भेडसावणारी एक मोठी समस्या म्हणजे पायांच्या टाचांवर पडणाऱ्या भेगा. कोरडी हवामान, त्वचेतल्या आर्द्रतेची कमतरता आणि पायांची योग्य देखभाल न केल्यामुळे या समस्या वाढतात. टाचा फुटल्याने वेदना होतात, चालण्यात अडथळा निर्माण होतो आणि कधीकधी संसर्गाची शक्यताही वाढते.
उन्हाळ्यात चेहरा–हात यांच्या काळजीकडे जास्त लक्ष दिले जाते, परंतु पायांची काळजी अनेकदा दुर्लक्षित केली जाते. म्हणूनच उन्हाळ्यातही टाचा फुटत असतील तर ती चिंता करण्यासारखी बाब आहे. अतिशय कोरडी त्वचा, पाण्याची कमतरता, धूळ, जास्त घाम, चुकीची पादत्राणे आणि पायांची स्वच्छता न राखणे ही काही प्रमुख कारणं मानली जातात.
तज्ज्ञ सांगतात स्वच्छता आणि आर्द्रता महत्वाची
टाचांवर भेगा पडण्यामागील प्रमुख कारण घाण आणि कोरडेपणा हेच आहे. रोज पाय स्वच्छ धुणे, मऊ कापडाने पुसणे आणि मॉइश्चरायझर लावणे अत्यंत गरजेचे आहे.
- पाय धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावा.
- दिवसातून किमान दोनवेळा पायांना क्रीम लावण्याची शिफारस केली जाते.
- युरिया, सॅलिसिलिक अॅसिड किंवा अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड असलेले मॉइश्चरायझर मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतात.
- रात्री शिया बटर लावल्यास त्वचा अधिक मऊ होते.
सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय
1. मध आणि कोमट पाण्यात पाय भिजवणे
- मध नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे आणि बॅक्टेरिया नष्ट करतो.
- टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात 2-3 चमचे मध मिसळा.
- पाय 15–20 मिनिटे भिजवा, हलके स्क्रब करा आणि क्रीम लावा.
- आठवड्यातून 3 वेळा केल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतात.
2. मॉइश्चरायझिंग पेस्ट
- ओट्स, मध, बदाम तेल, दूध आणि किंचित साखर यांची पेस्ट तयार करा.
- ती टाचांवर लावून 30 मिनिटांनी धुवा.
- त्यानंतर नारळाचे तेल लावा. यामुळे मृत त्वचा निघून टाचा मऊ होतात.
3. पायांची मालिश
हळद + ऑलिव्ह ऑइल किंवा पेट्रोलियम जेली वापरून मालिश करावी. रात्री मोजे घालून झोपल्यास मिश्रण त्वचेत चांगले शोषले जाते.
4. नारळाचं तेल
नारळाच्या तेलाचे अँटी-बॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म भेगा लवकर भरून काढतात. रात्री टाचांना तेल लावून मसाज करा. मोजे घालून झोपा.
5. कोरफड आणि ग्लिसरीन
कोरफड त्वचा शांत आणि मऊ करते. 2 चमचे एलोव्हेरा जेल + 1 चमचा ग्लिसरीन मिक्स करून रात्री लावा. सकाळी धुवा.
नियमित वापराने भेगा भरायला मदत होते.
6. केळीचा पॅक
पिकलेले केळं मॅश करून त्यात थोडं नारळाचं तेल मिसळा. 20 मिनिटांसाठी टाचांवर लावा. आठवड्यातून 2–3 वेळा हा उपाय उत्तम.
योग्य पादत्राणे; टाचा तुटण्याचे टाळण्यासाठी महत्वाचे
- बाहेर जाताना मोजे घाला.
- पायांना मोकळे, मऊ आणि आरामदायक शूज वापरा.
- कठीण तळाचे किंवा घट्ट पादत्राणे टाळा.
भेगा पडलेल्या टाचांसाठी ३ प्रभावी आणि सोपे घरगुती उपाय:
१) व्हॅसलीन + लिंबाचा रस
- टाचा मऊ करण्यासाठी सर्वोत्तम उपाय
- एका छोट्या बाऊलमध्ये १ चमचा व्हॅसलीन घ्या.
- त्यात १ चमचा लिंबाचा रस घालून नीट मिक्स करा.
- एका भांड्यात कोमट पाणी घेऊन १० मिनिटे पाय भिजत ठेवा.
- पाय कोरडे करून तयार मिश्रण टाचा आणि पायांच्या कोरड्या भागांवर लावा.
- रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी पाय धुवून चांगले मॉइश्चरायझर लावा.
- लिंबाच्या रसातील सिट्रिक अॅसिड मृत त्वचा मऊ करते आणि व्हॅसलीन त्वचेला खोलवर हायड्रेट करते.
२) केळी + मध
- टाचांना नैसर्गिकरीत्या पोषण देण्यासाठी
- एका बाऊलमध्ये पिकलेली केळी चांगली मॅश करा.
- त्यात मधाचे काही थेंब घालून पेस्ट बनवा.
- ही पेस्ट टाचांवर लावा आणि ३० मिनिटे तसेच राहू द्या.
- नंतर कोमट पाण्याने धुवून पाय कोरडे करा.
केळीत असलेले व्हिटॅमिन A, C आणि B6 टाचा मऊ करतात तसेच ड्रायनेस कमी करतात. मध त्वचा मऊ व बॅक्टेरियामुक्त ठेवतो.
३) व्हिनेगर + तांदळाचे पीठ + मध
- मृत त्वचा काढण्यासाठी उत्कृष्ट स्क्रब
- एका बाऊलमध्ये २ चमचे तांदळाचे पीठ घ्या.
- त्यात ५–७ थेंब व्हिनेगर आणि १ चमचा मध घालून पेस्ट तयार करा.
- एका भांड्यात कोमट पाणी घेऊन १० मिनिटे पाय भिजवा.
- आता ही पेस्ट टाचांवर लावून हलक्या हाताने घासून घ्या.
- नंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवा.
- तांदळाच्या पिठातील कण मृत त्वचा काढतात, व्हिनेगर त्वचा मऊ करतो आणि मध त्वचेला पोषण देतो.
त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी पोषण महत्वाचे आहे. ओमेगा–3 फॅटी अॅसिड: मासे, अक्रोड, सोया, पालक व्हिटॅमिन. E: हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य, काजू, वनस्पती तेल हे घटक त्वचेची गुणवत्ता सुधारतात आणि कोरडेपणा कमी करतात.

