आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. दिवसातील चोवीस तासांपैकी बहुतांश वेळ आपण स्क्रीनसमोर घालवत असतो. फोन, संगणक किंवा टॅब्लेट. ऑफिसमध्ये काम करणारे अनेक जण दररोज ९ तासांपेक्षाही जास्त वेळ स्क्रीनकडे पाहत असतात. याचा परिणाम म्हणून स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम (Smartphone Vision Syndrome) किंवा डिजिटल आय स्ट्रेन (Digital Eye Strain) ही समस्या वेगाने वाढत आहे.
स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम म्हणजे काय?
डिजिटल उपकरणांकडे दीर्घकाळ सलग पाहिल्यामुळे डोळ्यांवर होणारा ताण म्हणजे स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम. स्क्रीनकडे सतत लक्ष केंद्रित ठेवावे लागल्याने डोळ्यांवर दबाव येतो, पापण्या कमी वेळा पडतात आणि स्क्रीनमधील निळ्या प्रकाशाचा परिणामही डोळ्यांवर होतो. त्यामुळे जळजळ, थकवा, कोरडेपणा आणि दृष्टी अंधुक होण्याची लक्षणे दिसू लागतात. ही समस्या आता प्रौढांसोबतच मुलांमध्येही झपाट्याने वाढत आहे.
स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोमची सामान्य लक्षणे
- डोळ्यांचा थकवा व ताण – दीर्घ स्क्रीनटाइमनंतर डोळे दमल्यासारखे वाटणे
- कोरडे डोळे – पापण्यांची हालचाल कमी झाल्याने ओलावा कमी होणे
- धूसर किंवा अंधुक दिसणे
- डोकेदुखी – डोळ्यांवरचा ताण मेंदूपर्यंत पोहोचल्याने
- मान व खांदेदुखी – चुकीच्या आसनामुळे
- जळजळ, खाज, लालसरपणा
- प्रकाशाची संवेदनशीलता – स्क्रीनच्या प्रकाशामुळे त्रास वाढणे
व्हिजन सिंड्रोमची प्रमुख कारणे
- स्मार्टफोन / संगणकाचा दीर्घकाळ सलग वापर
- जास्त ब्राइटनेस किंवा चुकीच्या स्क्रीन सेटिंग्स
- स्क्रीन अतिसमोर ठेवणे
- कमी प्रकाशात स्क्रीन वापरणे
- मध्ये-मध्ये ब्रेक न घेणे
- लक्ष केंद्रित करण्याची सतत गरज
- जुने किंवा चुकीचे चष्म्याचे नंबर
स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम टाळण्याचे उपाय
- 20-20-20 नियम : दर 20 मिनिटांनी, 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद बघा
- फोन / स्क्रीनचा ब्राइटनेस वातावरणानुसार ठेवा
- ब्लू लाईट फिल्टर किंवा नाइट मोड वापरा
- काम करताना योग्य पोश्चर ठेवा
- डोळ्यांना नियमित विश्रांती द्या
- पुरेसे पाणी प्या
- गरज असल्यास नियमित डोळ्यांची तपासणी करा
डोळ्यांच्या ताणाची कारणे (Computer Vision Syndrome)
- स्क्रीनसमोर जास्त वेळ राहणे
- निळा प्रकाश व पडद्याची चमक (glare)
- चुकीचे बसण्याचे अंतर
- स्क्रीन वापरताना कमी वेळा पापणी पडणे
- दुरुस्त न केलेल्या दृष्टी समस्या
उपचार व व्यवस्थापन
- ब्लू लाईट फिल्टर चष्मे
- कृत्रिम अश्रू (Artificial tears) – कोरडेपणासाठी
- योग्य नंबरचा चष्मा / संगणक-विशिष्ट लेन्स
- एर्गोनॉमिक सुधारणा – स्क्रीन ब्राइटनेस, फॉन्ट, अंतर
- आवश्यक असल्यास दृष्टी उपचार (Vision Therapy)
डोळ्यांचे सोपे व्यायाम
- डोळे मिचकावणे– ओलावा टिकवण्यासाठी
- फोकस बदलणे – जवळ/दूर वस्तूंवर लक्ष केंद्रित करणे
- पामिंग – हात गरम करून डोळ्यांवर ठेवणे
- डोळे फिरवणे – रक्ताभिसरण सुधारते
स्मार्टफोन व संगणकामुळे जीवन सोपे झाले असले तरी त्यांच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. योग्य सवयी अंगीकारल्या, स्क्रीनटाइम नियंत्रित केला आणि डोळ्यांना नियमित विश्रांती दिली तर स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम टाळता येतो आणि दृष्टी दीर्घकाळ निरोगी राहते.

