हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका लक्षणीय वाढतो. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे कोरोनरी आर्टरी डिजीज (CAD) किंवा हार्ट ब्लॉकेज होण्याची शक्यता जास्त असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका तब्बल 31% ने वाढतो. त्यामुळे या ऋतूत हृदयाची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
थंडीच्या दिवसांत शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावत असल्याने रक्त घट्ट होण्याचा (ब्लड क्लॉट्स) धोका वाढतो. अशा वेळी हृदयाला रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी अधिक ताकदीनं पंप करावं लागतं, त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता निर्माण होते.
थंडीच्या काळात आपण तुलनेने जास्त खाणं करतो. जड, तेलकट किंवा प्रमाणाबाहेर खाल्ल्यामुळेही शरीरावर ताण येऊ शकतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत काही सोप्या पण महत्त्वाच्या सवयी ठेवणे गरजेचे आहे यासाठी उबदार कपडे घालणे, विशेषत: रात्रीच्या वेळी बाहेर पडताना हातमोजे, मफलर, टोपी वापरणे. शक्यतो तीव्र थंडीच्या रात्री बाहेर पडणे टाळावे.
शरीराला उष्णता देणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ आहारात सामावणे देखील उपयुक्त ठरते. थंडीच्या दिवसात अक्रोड, बदाम, खजूर, गूळ, हळद, आले यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला आवश्यक उर्जा आणि ऊब मिळते.
थंडीमध्ये विशेषता पहाटेच्या वेळी तीन ते सहा या दरम्यान हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. पहाटे किंवा सकाळच्या वेळी अनेकदा श्वास घ्यायला त्रास जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांची मदत घेणे गरजेचे आहे.
हार्ट ब्लॉकेजची लक्षणे – यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका
- छातीत अचानक वेदना, दाब किंवा घट्टपणा किंवा जडपणा जाणवणे
- जबडा आणि मानेपर्यंत वेदना होणं
- गॅससदृश त्रास नसतानाही छाती दुखणे
- चालताना किंवा हलका व्यायाम करताना श्वास घ्यायला त्रास
- हृदयाचे ठोके अचानक वेगाने धडधडणे
- अनियमित थकवा, अशक्तपणा, अंगात शक्ती न येणे
- हात-पाय थंड होणे, चक्कर येणे
- घाम येणे, बेचैनी, त्वचा फिकट पडणे
- मळमळ, उलट्या किंवा चिकट घाम
ही लक्षणे वारंवार दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर उपचाराने हृदयविकाराचा झटका टाळता येतो.
कंबररेषा सांगते हृदयाचे आरोग्य
लठ्ठपणा हा हृदयविकाराचा मोठा जोखीम घटक आहे.
- पुरुष: कंबर 37 इंचांपेक्षा जास्त
- महिला: कंबर 5 इंचांपेक्षा जास्त
पुरुषांमध्ये 40 इंच आणि महिलांमध्ये 35 इंच कंबर गंभीर धोक्याचे संकेत आहेत.
हार्ट ब्लॉकेजची प्रमुख कारणे
- उच्च रक्तदाब
- वाढलेले कोलेस्टेरॉल
- धूम्रपान
- मधुमेह
- शारीरिक हालचालींचा अभाव
- लठ्ठपणा
- कौटुंबिक इतिहास
- वाढती वयोमर्यादा
- अस्वास्थ्यकर आहार
हार्ट ब्लॉकेज टाळण्यासाठी प्रभावी उपाय
1. शरीर उबदार ठेवा
थंडीपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे घाला. रक्तवाहिन्या आकुंचन पावण्यापासून हे रोखू शकते.
2. नियमित व्यायाम
हिवाळ्यात बाहेर व्यायाम करणे कठीण असेल तर इनडोअर वर्कआउट करा.
3. हेल्दी आहार
- कमी चरबीयुक्त आहार
- फळे, भाज्या, कडधान्य, लीअन प्रोटीन
- ट्रान्स फॅट आणि प्रोसेस्ड फूड टाळा
4. तणाव कमी ठेवा
योगा, प्राणायाम, ध्यान, विपश्यना यांचा फायदा घ्या.
5. भरपूर पाणी प्या
डिहायड्रेशनमुळे हृदयावर ताण वाढतो, त्यामुळे नियमित पाणी प्या.
6. दारू आणि धूम्रपान टाळा
या सवयी रक्तवाहिन्यांचे नुकसान करतात आणि ब्लॉकेजचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवतात.
यांनी विशेष काळजी घ्यावी
- वृद्ध व्यक्ती
- कोरोनरी आर्टरी डिजीज असलेले रुग्ण
- हृदयाच्या झडपांच्या समस्या असणारे
- ऑटोइम्यून डिसीज (जसे ल्युपस) असलेले
- आधीपासून हृदयविकाराचे रुग्ण
थंडीत उद्भवणाऱ्या हृदयाशी संबंधित समस्या
- हृदयविकाराचा झटका (Heart Attack)
- स्ट्रोक
- उच्च रक्तदाब
- कार्डियाक अरेस्ट
का वाढतो धोका?
- थंडीत वेगाने चालल्यास किंवा धावल्यानं हृदयाला जास्त ऑक्सिजनची गरज भासते
- हिवाळ्यात फ्लू, ताप वाढल्याने हृदयावर अतिरिक्त ताण येतो
- व्यायाम करताना जाड कपडे घातल्यास शरीराचा तापमान संतुलन बिघडतो
हिवाळ्यात हृदयाची अशी घ्या काळजी
- खूप थंडी असेल तर बाहेर जाणे टाळा
- घरात ब्लोअर/हिटर वापरा
- इलेक्ट्रिक ब्लँकेटचा वापर करावा
- टोपी, मफलर, मोजे, गरम कपडे घालणे आवश्यक
- रोज किमान 30 मिनिटे हलका व्यायाम
- भरपूर पाणी प्या
- सिगारेट आणि दारू टाळा
- वजन नियंत्रणात ठेवा
- तणाव कमी ठेवा
- हृदयाचे रुग्ण भारी व्यायाम टाळा
(डिस्क्लेमर : वरील प्रमाणे आपल्याला कोणताही त्रास जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या)

