(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समिती पंचशील नगर येथील तिसंग बौद्धवाडी ते सुंदरवाडी घरकुल वसाहत सुमारे १ कि.मी. पायवाट सरपंच दिप्ती वीर व उपसरपंच प्रकाश पवार यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान मोहीम राबवून स्वच्छ करण्यात आली.
सालाबादप्रमाणे यंदाही ही पाऊलवाट ग्रासकटर मारुन उपसरपंच प्रकाश पवार यांच्या सहकार्याने साफसफाई करून स्वच्छ करण्यात आली. याकामी बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष आयु.अनिल पवार, उपाध्यक्ष संदीप पवार, सेक्रेटरी पवार, सभापती प्रकाश भा.पवार, संदीप गो.पवार, यांच्यासह सभासद, तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा -नलिनी पवार, उपाध्यक्ष संपदा पवार, सेक्रेटरी रिना पवार, करुणा पवार, सभापती नम्रता पवार, सल्लागार मयुरी पवार, कलावती पवार, नंदिनी पवार, कल्पना पवार, महिला मंडळाच्या सदस्यांनी या कामी उत्तम मेहनत घेऊन ही स्वच्छता अभियान मोहीम यशस्वी केली.
तिसंग बौद्धवाडी बुद्ध विहार मार्गे सुंदरवाडी ही पाऊलवाट आजूबाजूला असलेल्या जुन्या झाडी झुडपे, जंगली फांद्या, गवत कापून साफसफाई करण्यात आली.

