(गणपतीपुळे / वैभव पवार)
लोकनेते शामरावजी पेजे यांच्या ११० व्या जयंती निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती कोमसाप युवाशक्ती प्रमुख अरुण मोर्ये यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा मर्यादित असणाऱ्या या निबंध स्पर्धा दोन विभागात घेण्यात येणार आहे. उत्तर रत्नागिरी विभाग (मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर) व दक्षिण विभाग (संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर) तर तीन गटात ही स्पर्धा घेतली जाईल.
अ. शालेय गट (८वी ते १० वी).
विषय : १.शामरावजी पेजे : सामान्य माणसांचे नेते,
२.एका जननेत्याची राजकीय प्रवासगाथा
ब. महाविद्यालयीन गट (११वी ते १५ वी व समकक्ष)
विषय : १.कोकणातील सामाजिक-आर्थिक विकासाचे प्रणेते : शामरावजी पेजे
२.“गाव माझा, जबाबदारी माझी” : शामरावजी पेजेंची विकासदृष्टी
क. खुला गट-
विषय :१.ग्रामीण विकासाच्या भारतीय मॉडेलमध्ये पेजे यांचे स्थान.
२.“पेजे पॅटर्न” : जनसेवा, पारदर्शकता आणि नेतृत्वाचे आदर्श मॉडेल.
निबंध स्पर्धा – निकष व अटी
१) स्पर्धकाने आयोजकांनी दिलेल्या विषयावरच निबंध लिहावा. विषयांतर झाल्यास निबंध विचारात घेतला जाणार नाही.
२) शालेय गट : ३००–५०० शब्द
महाविद्यालयीन गट : ८००–१००० शब्द
खुला गट : १२००–१५०० शब्द
शब्दमर्यादा १०% पर्यंत जास्त–कमी ग्राह्य धरली जाईल.
३) निबंध मराठी भाषेतच लिहावा. भाषाशुद्धता आणि शुद्धलेखनाला विशेष गुण दिले जातील.
४) निबंधामध्ये खालील घटक अपेक्षित— प्रस्तावना, मुख्य विवेचन / उपशीर्षके , विचारांची मांडणी व सलगता
निष्कर्ष, सुसंगत, स्वच्छ आणि मुद्देसूद मांडणीला जास्त प्राधान्य दिले जाईल.
५) निबंध पूर्णतः स्वतःचा असावा. दुसऱ्याची नक्कल, AI कॉपी–पेस्ट किंवा पुस्तकातील मजकूर तंतोतंत वापरल्यास व तसे आढळल्यास निबंध बाद ठरविण्यात येईल. विचारांची मौलिकता, स्वतःचा दृष्टिकोन आणि विश्लेषणाला जास्त गुण दिले जातील.
६) आशयगर्भता व समग्रता : विषयाचे अचूक आकलन व्हावे. मुद्देसूदता आणि संबंधित उदाहरणे, आकडेवारी / ऐतिहासिक संदर्भ / सामाजिक दृष्टी, विश्लेषणात्मक विचारशक्ती
निबंधाची प्रभावीता विचारात घेतली जाईल.
७) लेखनशैली : प्रवाही भाषा, नैसर्गिक शब्दप्रवाह, अनावश्यक अलंकारिक शब्दांचा वापर टाळावा. संतुलित, समर्पक आणि सौंदर्यपूर्ण शैलीला प्राधान्य दिले जाईल.
८) निबंध काळ्या / निळ्या पेनने स्वच्छ हस्ताक्षरात लिहावा किंवा टंकलिखित करून खालील पत्त्यावर पाठवावा.
७४, प्रतिभासदन, मु. सत्कोंडी, पो. सैतवडे, ता. जि. रत्नागिरी ४१५६१३
९)परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
१०) मूल्यांकन निकष (एकूण १०० गुण)
विषयाचे आकलन २०
आशयाची समग्रता २०
मौलिकता व नवीन दृष्टिकोन २०
भाषाशुद्धता व शैली २०
रचना / मांडणी / निष्कर्ष २०
११) बक्षिसे
प्रथम, द्वितीय, तृतीय ,उत्तेजनार्थ पारितोषिक (आकर्षक सन्मानचिन्ह+ प्रमाणपत्र) व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
१२) निबंध पाठवायची अंतिम तारीख २५ डिसेंबर २०२५.
निकाल १० जानेवारीला २०२६ ला जाहीर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
अन्य अटी: आयोजकांना नियमांत फेरफार करण्याचा अधिकार राहिल. निबंधाचा वापर प्रकाशनासाठी किंवा अहवालासाठी केला जाऊ शकतो.
कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या निबंध स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अरुण मोर्ये ९१७५५२६६६० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

