(मालवण)
मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आणि शांततामय वातावरण अबाधित राहावे, यासाठी आज कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मालवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मारुती जगताप यांची भेट घेतली.
निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार, गोंधळ किंवा अनैतिक कृत्ये घडू नयेत यासाठी आवश्यक ती काळजी, देखरेख आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. निवडणुका पारदर्शक, शांततामय आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी पोलिस विभाग व स्थानिक प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचा विश्वास या भेटीत व्यक्त करण्यात आला.
यावेळी मालवणच्या नागरिकांनीही शांतता, शिस्त आणि जबाबदार नागरिकत्व जपत लोकशाही प्रक्रियेस सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज असून मुक्त, स्वच्छ आणि निर्भय वातावरणात निवडणूक पार पडण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मारुती जगताप यांनी सांगितले.

