( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुका मराठी अध्यापक संघ आणि शिक्षण विभाग पंचायत समिती देवरुख तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आयोजित अभिवाचन आणि निबंध स्पर्धा २०२५ मध्ये पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरच्या कु.क्रिशा कपिल इंदानी (इयत्ता ८वी) हिने माध्यमिक गटात तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सदर स्पर्धा कळंबस्ते येथील र. दि. गार्डी विद्यालयात मंगळवारी संपन्न झाली. यामध्ये क्रिशा इंदानी हिने संत ज्ञानेश्वर यांच्यावर निबंध लेखन केले होते. क्रिशा इंदानी हिने या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तिचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिन देव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आदींनी अभिनंदन केले आहे. क्रिशा इंदानी हिने यापूर्वी तालुका जिल्हा आणि विभाग स्तरावर कथाकथन, वक्तृत्व आणि निबंध अशा विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. क्रिशाची आई अपर्णा दायमा या विज्ञान विषयाच्या पदवीधर शिक्षक म्हणून तांबेडी पूर्ण प्राथमिक शाळा येथे कार्यरत असून त्यांचेही क्रिशाला मार्गदर्शन मिळत असते.

