( देवरूख / सुरेश सप्रे )
संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धामापूरच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य वर्दिनी तुळसणी, वाशी तर्फे देवरूख, निवे बु, आबवली या चार उपकेंद्राना राज्य शासनावतीने दिला जाणारा कायाकल्प पुरस्कार जाहिर झाला आहे.
या कायाकल्प पुरस्कारासाठी उपकेंद्राची परिसर स्वच्छता, अंतर्गत स्वच्छता, कामकाज, पर्यावरण, आरोग्य विषयक कार्य क्रम, आरोग्य सेवा, प्रसुतीगृह देखभाल स्वच्छता, पिण्याचे पाणी, सहा राष्ट्रीय कार्यक्रम सेवा जनजागृती, आरोग्य शिक्षण, लसीकरण, कुंटूब नियोजन कार्य क्रम,औषध पुरवठा, हिरकणी कक्ष, प्रतिक्षाकक्ष, कुंटूब नियोजन साधने जनजागृती, स्तनपान, पोषण आहार, असंसर्गजन्य आजार जनजागृती सेवा आरोग्य शिक्षण, धन कचरा व्यवस्थापन, अग्निशामक व्यवस्थापन, ओपीडी व्यवस्थापन, इमारत व कंपाऊड व्यवस्थापन विघुत व्यवस्था, औषधे वृक्षलागवड, फुलझाडे, गप्पी मासे पैदास केंद्र, बैठक व्यवस्थापन, प्रतिक्षालय, NCD / कॉर्नर, क्षारसंजिवनी कॉर्नर, आरोग्य शिक्षण माहिती पत्रक, वाचनालय, हिरकणी व्यवस्था. ओपीडी व्यवस्थापन,औषध उपचार व्यवस्थापन, दैनदिन कामकाज नोंद वही, व्यवस्थापन आदी बाबीचे परिक्षण करण्यात येते.
या वर्षासाठी उपकेंद्र तुळसणी, वाशी तर्फे देवरूख, निवे बु, आबवंली ही चार उपकेंद्रांची कायाकल्प पुरस्कार मूल्यांकन मध्ये टक्केवारी उत्तम प्राप्त झाली असल्याने हा पुरस्कार देण्यात आला आहे. या उपकेंद्राचे कायाकल्प साठी कामकाज वैद्यकिय अधिकारी डॉ रायभोळे, डॉ भक्ती वाजे, डॉ विजय पवार, डॉ, भुसारी याच्या मार्गदर्शन खाली सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव नागरगोजे, प्रसाद व्हालकर, मेघा टोंगे, मनिषा भांगे, सुर्यवंशी, आशा सुपरवायझर श्रुती सप्रे मॅडम, यांचे सह सर्व उपकेंद्र मदतनीस, आशा वर्कर यांनी मेहनत घेतली.