(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील निवधे धनगरवाडी येथे सर्पदंशामुळे ५० वर्षीय शेतकरी सुरेश फटू कोलापटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
२८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास राहत्या घरातच त्यांना सर्पदंश झाला. तत्काळ त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेची नोंद देवरुख पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

