(रत्नागिरी)
शहरातील लेप्रेसी कॉलनी–उद्यमनगर परिसरात एका 33 वर्षीय तरुणाने अज्ञात कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (18 नोव्हेंबर) पहाटे उघडकीस आली. सकाळी सुमारे 5.30 वाजता हा प्रकार समोर येताच परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव आशिष रोहित माने (वय 33, रा. लेप्रेसी कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी) असे आहे. घरातील वाशाला ओढणीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतला होता. सकाळी नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आशिषला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद जिल्हा रुग्णालय पोलिस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अत्यंत दुर्दैवी पद्धतीने तरुणाने आयुष्य संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

