(देवळे / प्रकाश चाळके)
देवरुख येथील सामाजिक बांधिलकी जपणारे दत्तात्रय भस्मे यांची नामदेव समाजोन्नती परिषदेने जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. भस्मे यांच्या सामाजिक कार्याची आवड लक्षात घेऊन, संघटन कौशल्य, शिंपी समाजाच्या बद्दलची असलेली तळमळ, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रती असलेली श्रद्धा, तसेच असलेली सामाजिक प्रश्नांची जाणीव, व सद्या करीत असलेल्या समाजोपयोगी कामांचा विचार करुन जिल्हाध्यक्ष पदाची जबाबबदारी परिषदेने दिली आहे. पुढील अधिवेशन होईपर्यंत भस्मे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाल राहणार आहे.
महाराष्ट्रातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील शिंपी समाजाच्या विकासासाठी, एकतेसाठी उपयोग व्हावा म्हणून नामदेव समाजोन्नती परिषदेच्या अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा, नामदेव समाजोन्नती परिषद या पदावर दत्तात्रय भस्मे यांची नामदेव समाजोन्नती परिषदेचे राज्य अध्यक्ष संजय नेवासकर यांच्या सुचनेवरून हि निवड करण्यात आली आहे.
यावेळी भस्मे यांनी आपल्यावर दिलेली अध्यक्षपदाची जबाबदारी आपण सर्वांना सोबत घेवून व समाजाच्या हिताचे निर्णय घेवून पार पाडू अशी ग्वाही दिली. जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी जाहीर झालेपासून दत्तात्रय भस्मे यांचे अभिनंदन वर्षाव होत आहे.

