(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील आणि रत्नागिरी तालुक्याच्या हद्दी वरच्या चोरवणे गावात शिवसेना शाखेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक अण्णा सामंत यांच्या हस्ते दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारी पार पडले.
चोरवणे गावच्या सहाणे जवळ ही शाखा बांधण्यात आली असून. याप्रसंगी पाली येथील नामवंत उद्योजक श्री अण्णासाहेब सामंत , विलास चाळके, विलास बेर्डे, विभागप्रमुख राजेश कामेरकर यांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. गावप्रमुख मंदार कात्रे, गावकर सखाराम कांबळे, सरपंच दिनेश कांबळे, उपसरपंच अनंत बसवंणकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुदेश चव्हाण, पोलीस पाटील अमित कांबळे, भाजप पदाधिकारी सदानंद कांबळे, शाखाप्रमुख दीपराज कांबळे व उपशाखाप्रमुख रवींद्र कामत, निलेश लाड त्याचप्रमाणे चोरवणे गावातील शिवसैनिक व ग्रामस्थ, बहु संख्य महिला यां कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
आमदार किरण सामंत व पालकमंत्री उदय.सामंत यांच्या सौजन्याने यावेळी ग्रामस्थाना छत्रीवाटप करण्यात आले. तसेच उपस्थिताना जिलेबी वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

