(देवरूख / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुका शिवसेना (शिंदे) युवासेनेच्या वतीने उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त पुरुषांसाठी तालुकास्तरीय भव्य रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता लोवले येथील मयुरबाग मैदानावर होणार आहे.
स्पर्धा पूर्णपणे निशुल्क असून तालुक्यातील संघांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवासेनेचे युवक उपतालुका प्रमुख सुधीर चाळके यांनी केले आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 10,001 रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी 7,001 रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी 3,001 रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी स्पर्धकांनी सुधीर चाळके – 9324144838, प्रथमेश साळवी – 8007296042, ओंकार चव्हाण – 9561271576 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

