( संगमेश्वर / प्रतिनिधी )
आयुष्यात त्यांनाच चांगल मिळत, जे वाट पाहतात. त्यापेक्षाही अधिक चांगल, त्यांना मिळत..जे प्रयत्न करतात. आणि जे मेहनतीवर अतूट विश्वास ठेवतात ते जीवनात सर्वोत्तम होतात.असा विश्वास ज्येष्ठ रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्ते अशोक पोंक्षे यांनी व्यक्त केला. ते माखजन इंग्लिश स्कूल येथे गुरुदक्षिणा सभागृहात, राज्यस्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेच्या व दशक्रोशिस्त चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते.
माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे, अशोक पोंक्षे कलादालनाच्या माध्यमातून दशक्रोशोतील प्राथमिक, माध्यमिक शाळांसाठी दशक्रोशस्त चित्रकला घेण्यात आली.व राज्यस्तरीय खुली निसर्ग चित्र स्पर्धा झाली. संस्था अध्यक्ष किशोरकुमार साठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक पोंक्षे, हनुमान पोंक्षे, अविनाश पोंक्षे, संस्था सचिव दीपक पोंक्षे, उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर, मुख्याध्यापक महादेव परब, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत भोसले, मनोज शिंदे,दीपक शिगवण, संजय सहस्त्रबुद्धे, सुभाष सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.
दरम्यान पोंक्षे पुढे म्हणाले की, प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी अपार मेहनत घेतली पाहिजे.यासाठी त्यांनी अनेक दाखले दिले. निसर्ग चित्र स्पर्धा ही राज्यस्तरीय ठेवण्याचं मूळ कारण सांगताना ते म्हणाले, की राज्यभरातील स्पर्धकांनी कोकणात याव आणि कोकणातील सौंदर्य आपल्या कुंचल्यानी रेखाटावं हा होता. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद राज्यभरातून मिळाल्याने अशोक पोंक्षे यांनी स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक केले.
दरम्यान राज्यस्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेत देवरुखच्या डी कॅड चा विद्यार्थी अमर अजित राऊळ याने प्रथम क्रमांक मिळवला. त्याला १२ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तर कार्तिक कुंभार(बारामती) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.यांना १० हजार व सन्मानचिन्ह देण्यात आले.आणि संदीप कुंभार (इचलकरंजी) तृतीय क्रमांक आला. यांना ८ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर विरारच्या ओंकार धवन यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.यांना ६ हजार व सन्मानचिन्ह देण्यात आले.आणि अथर्व पाटील आणि आदित्य गुरव यांना विशेष सहभाग म्हणून गौरविण्यात आले.
दशक्रोशस्त चित्रकला स्पर्धेत गट क्रमांक १ मध्ये (इयत्ता ३री ते ४ थी) वक्रतुंड गुरव, प्रथम,(सरंद शाळा नं.१), वेदश्री भायजे,द्वितीय (धामापूर नं ८), पूर्वा बाटे तृतीय(मुरडव नं १), तर श्रद्धा मेस्त्री उत्तेजनार्थ (माखजन कुंभारवाडी). गट क्रमांक २( ५ वी ते ७ वी) मध्ये प्राची निकम प्रथम(माध्यमिक विद्यामंदिर कुंभारखाणी),वेदांत बोटके, द्वितीय(जनता माध्यमिक विद्यालय कोकरे), वेदश्री जड्यार तृतीय, (माखजन इंग्लिश स्कूल,माखजन), आराध्या चव्हाण उत्तेजनार्थ, (ह.भ.प.माध्यमिक विद्यालय, नायशी) तर गट क्रमांक ३ (८वी ते १०वी) मध्ये अर्पिता बागवे प्रथम (माध्यमिक विद्यामंदिर कुंभारखाणी), साहिश मेस्त्री द्वितीय, (इंग्लिश मिडीयम स्कूल सरंद),सिमरन चांदिवडे तृतीय (माध्यमिक विद्यालय करजुवे), क्षितिज कदम उत्तेजनार्थ (ह.भ.प.माध्यमिक विद्यालय नायशी) आदिनी क्रमांक पटकावले.
बक्षीस पात्र विद्यार्थ्याना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दशक्रोशिस्त चित्रकला स्पर्धेला २९० विद्यार्थी तर राज्यस्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेला छ.संभाजीनगर, अहिल्यानगर, बारामती, मुंबई, पुणे, अशा विविध ठिकाणाहून ९४ स्पर्धक आले होते. या स्पर्धेचे समन्वयक म्हणून गणेश शिंदे व संतोष कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर संपूर्ण स्पर्धा सुयोग्य रित्या होण्यासाठी अशोक पोंक्षे कलादालन प्रमुख अमोल पाटील यांनी मेहनत घेतली.
निसर्ग चित्र स्पर्धेचे परीक्षण परशुराम गावनांग (खेड), प्रवीण मिसाळ (चिपळूण) यांनी केले. दरम्यान कार्यक्रमावेळी अध्यक्ष किशोरकुमार साठे, मुख्याध्यापक महादेव परब यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव शिंदे, प्रस्ताविक गौरव पोंक्षे यांनी तर आभार धनश्री राजेसावंत भोसले यांनी मानले.

