(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून प्रसाद सुरेश सावंत यांनी रविवारी सर्वप्रथम आपला उमेदवारी अर्ज सादर करत प्रचारयुद्धाची अधिकृत सुरुवात केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना आज १७ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची मुभा दिली असून, रविवारीही दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली होती. आज शेवटचा दिवस असल्याने आज अंतिम क्षणी अनपेक्षित असलेल्या उमेदवारांचे अर्ज येणारी संख्या जास्त राहणार आहे.
रत्नागिरी शहर प्रभाग क्र. ३ ‘ब’ मधून प्रसाद सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज सादरीकरणावेळी शिवसेना उपनेते सुरेंद्रनाथ (बाळ) माने, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांसह पदाधिकारी उपस्थित होते. नगरपालिका निवडणुकीचा रंगतदार शर्यतीकडे वाटचाल सुरू झाली असून पुढील एक दिवसांत पक्षांकडून उमेदवारांची धावपळ आणखी वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

