(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा बाजारपेठ परिसरातील कांबळे लावगण फाटा येथे बंद दुकानाच्या मागील बाजूस सुरू असलेल्या गुप्त मटका जुगार अड्ड्यावर जयगड सागरी पोलिसांनी गुरुवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी १.४० वाजता अचानक कारवाई केली. यात एका व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले असून, या प्रकरणी गुन्हा नं. ४८/२०२५ महा. जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पो.शि. रविंद्र रघुनाथ आठवले (बकल नं. १०२९) यांच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत राजेश भिमाकांत पाटील (वय ४९, रा. मालगुंड, भंडारवाडा, ता. जि. रत्नागिरी) हा व्यक्ती कल्याण मटका नावाचा जुगार चालवताना आढळला. आरोपी शुभांकावर पैज स्वीकारून जुगार खेळवत असल्याचे पोलिसांच्या पडताळणीत निष्पन्न झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ₹५१९ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ₹५१२ रोख रक्कम, विविध जुगार साहित्य यांचा समावेश आहे. जयगड सागरी पोलिसांनी जुगारविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून ही कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे.

