(चिपळूण)
रत्नागिरी जिल्हा गणित अध्यापक मंडळ व चिपळूण तालुका गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा गुरुवार, १३ नोव्हेंबर २०२५ रोजी युनायटेड हायस्कूल, चिपळूण येथे उत्साहात पार पडली. चिपळूण तालुक्यातील तब्बल २५ शाळांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी–चिंचघरी सती विद्यालयातील विद्यार्थीनी
कु. दक्ष दिनेश गिजये व कु. मनस्वी परशुराम सुर्वे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या यशस्वी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री. विजय बागवे, चिपळूण तालुका गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष श्री. मोटगी, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्री. प्रसाद खातू, तसेच युनायटेड हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. वाचासिद्ध यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थिनींना गणित शिक्षिका कु. शर्मिला शिवराम म्हादे यांनी मार्गदर्शन केले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा आमदार श्री. शेखर निकम, संस्थेचे सेक्रेटरी श्री. महेश महाडिक, जेष्ठ संचालक श्री. शांताराम खानविलकर, अन्य पदाधिकारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय वरेकर, उपमुख्याध्यापिका सौ. सुलोचना जगताप, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षिका यांचे अभिनंदन करण्यात आले.

