(रत्नागिरी)
जिल्ह्यातील विविध भागांतून काही व्यक्ती नापत्ता झाल्याची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. या सर्वांचा शोध पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत असून नागरिकांना खालील व्यक्तींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
कु. शिवानी सिताराम म्हादे, वय १८ वर्षे, ३ महिने, १२ दिवस, धंदा शिक्षण रा. चिखली, पंडववाडी, ता. संगमेश्वर ही आईला कडवई येथे शिवणक्लासला जाते असे सांगून गेली, ती अद्यापपर्यंत आलेली नाही, नापत्ता झाली आहे. शिक्षण १२ वी, बांधा मध्यम, उंची ५ फुट ५ इंच, रंग- सावळा, चेहरा – उभट, डोळे – काळे, नाक- सरळ केस – लांब, अंगात – पोपटी रंगाचा पंजाबी ड्रेस, निळ्या रंगाची ओढणी, निळसर रंगाचा पायजमा, पायात सँडल, भाषा मराठी, कानात छोट्या रिंगा, नाकात पुली, गळ्यात काळ्या रंगाचा गोप आहे.
विनोद गोकुळदास पालेकर वय ४९ वर्ष रा. घर.नं.७ अ खेडशीनाका ता. जि. रत्नागिरी हे त्यांच्या राहत्या घरातून 17 ऑगस्ट 2021 रोजी नापत्ता झाले आहेत. त्यांची उंची ५ फुट ६ इंच ,बांधा मध्यम, केस काळे, नाक सरळ,नेसणीस सफेद फुल शर्ट व ऑफ व्हाईट रंगाची फुल पँट, भाषा मराठी
मयुरेश राजेंद्र साळवी वय वर्षे ३९, रा.गयाळवाडी खेडशी ता.जि. रत्नागिरी हा 3 मार्च 2024 रोजी गयाळवाडी खेडशी येथील राजन प्लाझा इमारत येथून नापत्ता झाला आहे. त्याची उंची ५ फुट ५ इंच रंग- गोरा, दाढी वाढलेली बांधा मध्यम केस विग लावलेला, डावे हाताचे करंगळीत चांदिची अंगठी, नेसणीस फुल पेंट व शर्ट शिक्षण – हॉटेल मॅनेजमेंट.
रेश्मा प्रकाश राठोड, वय-३५ वर्षे या त्यांच्या 2 मुलांसह टिके, भातडेवाडी, गणेशनगर स्टॉपजवळ, येथून नापत्ता झाल्या आहेत. गणेशनगर स्टॉपजवळ येथे सलील काझी यांच्याकडे भाड्या राहत होत्या, त्या मुळ रा.विजापूर सोमदेव हट्टी एल.टी.नं.१, कर्नाटक येथी आहेत. त्यांचा वर्ण- गोरा, उंची ०५ फुट, बांधा- सडपातळ, शिक्षण- नाही, केस काळे लांब, डोळे – काळे, नेसणीस साडी गुलाबी रंगाची साडी, पायात चप्पल, बोली भाषा- मराठी, बंजारा, हिंदी, दात- शाबुत, डावे हाताचे अंगठ्यावर इंग्रजीमध्ये पी अक्षर गोंधलेले आहे. कानात पिवळसर रंगाच्या धातुचे रिंगा, काळ्या मण्याचे मंगळसुत्र, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या, नाकात पुली, सोबत नोकीया कंपनीचा मोबाईल त्यात आयडीया कंपनीचे सीम त्याचा क्र. ८०१०१५०६६३ असा आहे.
प्रथमेश प्रकाश राठोड वय-०७ वर्षे, वर्ण- सावळा, उंची अडीज फ्ट, बांधा सडपातळ, शिक्षण- पहिली, केस काळे, दात शाबुत, डोळे – काळे, नेसणीस पिवळ्या रंगाचे टिशर्ट व काळपट रंगाची हाफ पॅन्ट, पायात चप्पल, भाषा मराठी, बंजारा.
राजेश प्रकाश राठोड वय-०५ वर्षे, वर्णगोरा, बांधा गुडगुडीत, केस पिंगळे, उंची सव्वा दोन फुट, डोळे – काळे, दात – शाबत नेसणीस टिशर्ट व पॅन्ट, भाषा – मराठी
मोहन चौधरी, वय ४० वर्षे, मुळ राहणार गाव पालिका जानकी, जि. कैलाली, नेपाळ, सध्या राहणार घर नं. ३९२५ ए पांजरी मोहल्ला ता. जि. रत्नागिरी हे आठवडा बाजार रत्नागिरी येथून १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास नापत्ता झाले आहेत. शिक्षण नाही, धर्म हिन्दु, जात धारु, उंची ५ फुट ३ इंच, रंग सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, केस बारीक काळे, अंगात फिकट निळसर रंगाचे हाफ शर्ट, नेसणीस गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट, पायात चप्पल आहेत.

