(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरीत तालुक्यातील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा येथे भजनांचा जंगी सामना होणार आहे. दि.5 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वा.भजनांचा जंगी सामना – बुवा श्री .श्रीकांत शिरसाट, मुंबई × बुवा श्री .अभिषेक शिरसाट. दि.6 ऑक्टोबर रोजी सांय.4वा. हळदीकुंकू समारंभ, सांय.6वा. होम मिनिस्टर स्पर्धा रात्री 9.30वा. दांडियारास दि.7 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30वा. डान्स स्पर्धा (वयोगट 5 ते 18) संपर्क 942170 7589
दि.8 ऑक्टोबर रोजी सांय. 4.30 वा.गोंधळ – जोगवा मागण्याचा कार्यक्रम, सांय.7.30bवा.दिवटी नाचण्याचा कार्यक्रम. रात्री 10वा. गोंधळाची कथा. दि.9 ऑक्टोबर रोजी सांय.4.30वा. पाककला स्पर्धा (पदार्थ मुग) व रांगोळी स्पर्धा (विषय – संस्कार भारती ) रात्री 9.30वा. दांडिया रास. दि.10 ऑक्टोबर रोजी स.10वा. होमहवन, कुवारी पुजन रात्री 9.30वा. दांडिया रास दि.11ऑक्टोबर रोजी दु.1वा. महाप्रसाद, रात्री 10वा.बक्षीस वितरण समारंभ, रात्री 11वा.शक्ती तुर्यांचा जंगी सामना – बुवा श्री जगन्नाथ खारगांवकर, तुरेवाले रायगड × तेजल पवार शक्ती वाले खालगाव रत्नागिरी. दि.12 ऑक्टोबर रोजी सांय.5.30वा. मंदिरामध्ये सोने वाटपाचा कार्यक्रम. सांय.7.वा. आरती. रात्री 9.30वा. दांडिया रास. दि 13 ऑक्टोबर रोजी दु.3.30वा. आरती- गाऱ्हाणे, दु.4वा. देवीची विसर्जन मिरवणूक, रात्री 7.30वा. आरती.
या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्षा सौ.निहा आनंद साळवी यानी केले आहे.