(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील वरवडे धनगरवाडा येथे एका तरुण विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. ११) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत महिलेचे नाव अनिषा अनिल गोरे (वय ३३, रा. वरवडे धनगरवाडा, रत्नागिरी) असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिषा हिने घरी कोणी नसताना लाकडी बाराला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. काही वेळानंतर घरच्यांना हा प्रकार लक्षात आला, तेव्हा त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. जयगड पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

