(देवळे / प्रकाश चाळके)
बैलगाडा शर्यती ३ फेऱ्यांचे आदत-बैल व दुस्सा-बैल मैदान बोरगाव काड्याच माळ तासगाव कवठेमहांकाळ रोड (जि. सांगली) येथे आज रविवार दि.९ रोजी होणाऱ्या श्रीनाथ केसरी २०२५ या बैलगाडा शर्यतीसाठी देवरुख नजीकच्या पाटगावकरांचा लाडका “बादल” सज्ज झाला आहे.
पाटगावचे आप्पा गोपाळ यांचा “बादल” हा बैल “सोळजाई कुपा देवरूख आणि जय सांबा पाटगाव” या नावावर पळणार आहे. घाटावर तसेच कोकणात नांगरणी स्पर्धा छकड्याच्या अनेक स्पर्धांमध्ये बादल हा 1 नंबरचा मानकरी ठरला आहे.
तसेच त्याला कोकण केसरी चिपळूण मैदानात कोकण केसरी किताबही त्याला मिळाला आहे. घाटावर ‘बकासूर’ तर कोकणात ‘बादल’ची चर्चा जोरदार चालत असते. सांगली जिल्ह्यात होणाऱ्या या स्पर्धेत “बादल” नक्कीच घाट गाजवणार अशी जिद्द ठेवत त्यादृष्टीने जय सांबा पाटगावचे सर्व मित्र परिवार मेहनत घेत आहेत.

