(दापोली)
टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमानाने ७ वी १७ वर्षा खालील राष्ट्रस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२५ रोजी मथुरा, उत्तर प्रदेश येथे संपन्न होणार आहे.
१७ वर्षा खालील महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धा अकलूज, सोलापूर येथे पार पडली. या स्पर्धेमधून स्पर्धकांची निवड करण्यात आली. रत्नागिरीमधुन तालुका दापोली, कोंढे या गावातील सिद्धेश प्रदीप गोलांबडे याची चमकदार कामगिरी पाहून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामधून निवड करण्यात आली आहे.
सिद्धेश याने एका सामन्यामध्ये सामनावीर चषक मिळवला आहे. दापोली, वाकवली येथील डॉ. वि. रा. घोले हायस्कूल व पद्मश्री अण्णासाहेब बेहेरे जुनिअर कॉलेजचे त्याचे वर्ग शिक्षक हेमराज महांदु महाले यांनी सिद्धेश याला आर्थिक सहकार्य केले आणि त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सुमित अनेराव, जिल्हा सचिव सिद्धेश गुरव, टेक्निकल डायरेक्टर रोशन किरडवकर, मुख्य प्रशिक्षक मनोज पकये, पियुष पवार, साहिल सावंत यांनी मार्गदर्शन केले. तसेच तांत्रिक सल्लागार प्रथमेश डांगे, शैक्षणिक सल्लागार सुशांत राईन सर, रमाकांत कांबळे, सागर भारती, भावेश लोंढे, सुनील मोर्ये, गणेश खानविलकर यांनी मुलांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

