(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरीतील नांदिवडे गावच्या सुकन्या व सध्या ठाणे जिल्ह्यात सक्रिय असलेल्या सुनिता शशिकांत सुर्वे तथा काजल परेश नाईक यांना “कोकणरत्न” पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई, ठाणे व संपूर्ण कोकणामध्ये त्यानी आपला सामाजिक कार्यातून ठसा उमटवला आहे. दिव्यांगांना मासिक मानधन व दुकान देऊन त्यांनी दिव्यांगांचे संसार उभे केले आहेत. गोरगरिबांना, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. प्रकल्पग्रस्तांना देखील त्यांनी त्यांच्या मागण्या व त्यांना न्याय मिळवून देण्यास मोलाचा वाटा उचलला आहे. सध्या त्या प्रहार दिव्यांग क्रांती ठाणे जिल्हाध्यक्ष व कोकण आंदोलक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत स्वतंत्र कोकण राज्य अभियान ने त्यांना कोकणरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांना मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल रत्नागिरी आणि मुंबई भागातून काजल नाईक यांच्यावर अभिनंदनपर वर्षाव होत आहे.

