(मुंबई)
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालात मध्य प्रदेशातील धमनोड येथील मुकुंद अगिवाल याने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. फाउंडेशन परीक्षेत चेन्नईची एल. राजलक्ष्मी, तर इंटरमीडिएट परीक्षेत जयपूरची नेहा खानवानी अव्वल ठरली आहे. तसेच मुंबईतील नील शाह आणि अक्षत नौटियाल यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.
अंतिम परीक्षेत देशभरातून ग्रुप १ मध्ये ५१,९५५ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १२,८११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण २४.६६% इतके आहे. ग्रुप २ मध्ये ३२,२७३ विद्यार्थ्यांपैकी ८,१५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेचे प्रमाण २५.२६% इतके नोंदवले गेले. दोन्ही ग्रुप एकत्र दिलेल्या १६,८०० विद्यार्थ्यांपैकी २,७२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांचे प्रमाण १६.२३% आहे.
या परीक्षेत मुकुंद अगिवाल याने ५०० पैकी ४१७ गुण (८३.३३%) मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर हैदराबादचा तेजस मुंदडा (४९२ गुण – ८२%), तर तिसऱ्या क्रमांकावर अल्वरचा बकुल गुप्ता (४८९ गुण – ८१.५०%) ठरला.
सीए इंटरमीडिएट परीक्षा:
ग्रुप १ साठी ९३,०७४ विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यापैकी ८,८७० विद्यार्थी (९.४३%) उत्तीर्ण झाले. ग्रुप २ मध्ये ६९,७६८ विद्यार्थ्यांपैकी १८,९३८ विद्यार्थी (२७.१४%) उत्तीर्ण झाले. दोन्ही ग्रुप देणाऱ्या ३६,३९८ विद्यार्थ्यांपैकी ३,६६३ विद्यार्थी (१०.०६%) उत्तीर्ण झाले.
या परीक्षेत जयपूरची नेहा खानवानी हिने ६०० पैकी ५०५ गुण (८४.१७%) मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला.
अहमदाबादची क्रिती शर्मा हिने ५०३ गुण (८३.८३%) मिळवून दुसरा क्रमांक मिळवला, तर मुंबईचा अक्षत नौटियाल (५०० गुण – ८३.३३%) तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
सीए फाउंडेशन परीक्षा:
देशभरातील ५४४ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी ९८,८२७ विद्यार्थी बसले होते, त्यात ५१,१२० मुलगे आणि ४७,७०७ मुलींचा समावेश होता. एकूण १४,६०९ विद्यार्थी (१४.७८%) उत्तीर्ण झाले. मुलांपैकी ८,०४६ (१५.७४%), तर मुलींमधील ६,५६३ (१३.७६%) विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या.
या परीक्षेत चेन्नईची एल. राजलक्ष्मी हिने ४०० पैकी ३६० गुण (९०%) मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले. सूरतचा प्रेम अगरवाल (३५४ गुण) दुसऱ्या स्थानी, तर मुंबईचा नील शाह (३५३ गुण) तिसऱ्या स्थानी राहिला.

