(चिपळूण)
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ‘उत्सव नारी शक्तीचा, सन्मान नारी शक्तीचा’ या घोषवाक्याला साजेसा उपक्रम म्हणून ‘ॐ कार दातांचा दवाखाना’तर्फे खास महिलांसाठी ‘बेस्ट स्माईल कॉन्टेस्ट’ आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे परीक्षण ‘ॐकार दातांचा दवाखाना’च्या संचालिका व सुप्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ. सौ. सविता दाभाडे आणि पुणे येथील एमआयटी शिक्षण संस्थेतील प्रा. डॉ. सौ. प्रतिभा रायसोनी (एम.एस्सी., एम.एड., पीएच.डी., नेट (एज्यु.), डी.एस.एम.) यांनी केले. परीक्षकांनी दोन विजेत्या आणि दोन उपविजेत्या निवडल्या. विजेत्या सौ. अश्विनी पिलके आणि सौ. आरती वाटेकर यांना सन्मानचिन्ह, आकर्षक पैठणी, ॐकार दातांचा दवाखाना, चिपळूण यांचे रुपये दोन हजारांचे गिफ्ट व्हाउचर आणि एम. के. थिएटर, चिपळूण येथील दोन चित्रपट तिकिटांचे व्हाउचर देण्यात येणार आहेत. उपविजेत्या सौ. रूपाली ओसवाल आणि सौ. स्मिता यादव यांना ॐकार दातांचा दवाखाना, चिपळूण यांचे रुपये एक हजारांचे गिफ्ट व्हाउचर प्रदान करण्यात येईल.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले असून सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या तीन महिन्यांपर्यंत ॐकार दातांचा दवाखाना, चिपळूण येथे मोफत दंत तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, या स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ लवकरच आयोजित केला जाणार असल्याची माहिती डॉ. दाभाडे यांनी दिली.

