(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बौध्दाचार्य प्रशिक्षण उजळणी शिबिर आयु. प्रकाश रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली तर संस्कार समितीचे अध्यक्ष बौद्धाचार्य श्रामणेर संजय आयरे, सचिव रविकांत पवार गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, शिवाजीनगर येथील सभागृहात संपन्न झाले.
विचार मंचावर आयु.प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, संस्कार समितीचे अध्यक्ष संजय आयरे, सचिव रविकांत पवार यांचे समवेत रत्नागिरी तालुक्यातील बौध्दाचार्य दिनकर कांबळे, प्रशांत जाधव काशिनाथ तांबे, संदीप जाधव, दिपक कांबळे, संतोष कदम, हेमंत कांबळे, महेंद्र कांबळे, सुनिता आयरे, सतिश कदम, करुणा पवार,संघमित्रा पवार आदी उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून करण्यात आली. यावेळी त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर बौद्धाचार्यांना देण्यात आलेल्या विविध प्रत्येक गाथा विधीचे पठण करण्यात आले. सर्व विधींचे स्पष्ट उच्चार, कृती, आशय, मांडणी, साहित्य या बाबत सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले.

