(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांसाठी दिवसभर आध्यात्मिक वातावरणात पारंपरिक विधींची मालिका आयोजित करण्यात आली आहे.
बुधवार, दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा होणार असून, सकाळी ९ वाजता अभिषेक करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर १२.३० वाजता आरती होईल. पुढे दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री सहदेव पावसकर यांनी केले आहे.

