(रत्नागिरी)
रत्नागिरी शहराजवळील फणसोपसडा येथील लक्ष्मीकेशव नगर परिसरात मंगळवारी, दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी ६३ वर्षीय व्यापारी दीपक पुरुषोत्तम साळवी यांनी मानसिक तणावामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांच्या माहितीप्रमाणे, साळवी हे मागील चार-पाच वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर नियमित औषधोपचार सुरू होते. ते कसोप बसस्टॉप परिसरात आपले जनरल स्टोअर चालवत होते.
मंगळवारी सायंकाळी उशिरा त्यांच्या मुलाने दुकानाची पाहणी केली असता, बाहेरील दरवाजा बंद असूनही आतला दरवाजा उघडा होता. आत प्रवेश केल्यावर त्यांना वडिलांनी गॅल्व्हनाईज पाईपला फिटींगच्या वायरने गळफास घेतल्याचे दिसून आले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून खाजगी अॅम्ब्युलन्सने सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे नेले, परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंदवली असून (आ.मृ. क्र. १०९/२०२५), पुढील तपास सुरू आहे.

