(जाकादेवी / वार्ताहर)
वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे ता.रत्नागिरी संचलित माध्यमिक विद्यालय भागशाळा व श्रीम.पार्वती शंकर बापट कनिष्ठ विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाटद खंडाळा येथील १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेटच्या संघाने नुकत्याच झालेल्या शालेय रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेड ज्यू.कॉलेज, गुहागर ज्यू.कॉलेज तसेच अंतिम सामना गोविंदराव निकम ज्यू.कॉलेज सावर्डे संघावर विजय मिळवून कोल्हापूर विभागीय क्रिकेट स्पर्धेमध्ये आपली निवड निश्चित केली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील व जिल्ह्यातील काही मातब्बर संघांचा खंडाळा वाटद मुलांच्या क्रिकेट संघाने उत्तम क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट फलंदाजी व आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करून विजयश्री खेचून आणली.
या संघामध्ये सयोग आलिम, संस्कार बैकर (कर्णधार), समर्थ किंजले, कैवल्य पोवार, सागर गोरे, आयुष पावसकर, आर्यन मोरे, राज भुवड, आयान लोकरे, पियुष गुरव, शुभम धनावडे, प्रशांत मालप, विघ्नेश चौगुले, सार्थक जाधव, आर्य सुर्वे, ओम झर्वे हे खेळाडूंचा होता. या संघाला अनुभवी क्रीडा शिक्षक डॉ.राजेश जाधव,पल्लवी बोरकर यांनी अधिक मेहनत घेऊन मार्गदर्शन केले. या विजयी संघाचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विचारे, उपाध्यक्ष रामनाथ आडाव, सचिव समीर बोरकर, सुभाषराव विचारे, संदीप सुर्वे, दिवाकर जोशी, तुषार चव्हाण, किशोर मोहित, अनिकेत सुर्वे यांनी संघाचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो – वाटद खंडाळा मुलांचा जिल्हा विजेता संघ व संघासोबत मार्गदर्शक क्रीडाशिक्षक डॉ.राजेश जाधव, पल्लवी बोरकर.

